मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर, चार आठवड्यानंतर होणार सुनावणी

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर २०२०: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी घटनापीठाकडे जावे, असे म्हटले आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडली. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.

सर्वोच्च न्यायालय आरक्षणावरील स्थगिती उठवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही सुनावणी सकाळी सुरु झाली त्यावेळी सरकारी वकील उपस्थित नसल्याने मराठा आरक्षणाची सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली होती. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती.

आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा