प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

11

मुंबई, २० जानेवारी २०२३ :प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. महेश भट्ट यांच्यावर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. महेश भट्ट यांचा मुलगा राहुल याने या बातमीची पुष्टी केली आहे.

महेश भट्ट गेल्या यांची अँजिओप्लास्टी झाली असून, गेल्या महिन्यात त्यांच्या हृदयाची तपासणी झाल्यानंतर लवकरच शस्त्रक्रियेची गरज भासू लागली. त्यानंतर महेश भट्ट यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याबाबत राहुल भट्ट याने सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती आता ठीक आहे आणि ते घरी परतले आहेत.

महेश भट्ट यांनी वयाच्या २६ व्या वर्षी ‘मंजिलें और भी हैं’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. १९७४ पासून चित्रपटाचे दिग्दर्शिन करण्यास सुरुवात केली. १९८४ मधील ‘सारांश’ हा त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता, जो १४ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. याशिवाय आशिकी, जिस्म, जहर यासारखे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. तसेच दुश्मन, राज आणि फुटपाथ यासारख्या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा