इंग्लंड मध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट

लंडन, १० ऑगस्ट २०२२: ग्लोबल वॉर्मिंगने तयार झालेल्या तीव्र उष्णतेच्या आणि कोरड्या हवामानाने फ्रान्स आणि यूकेला या आठवड्यासाठी नवीन इशारे जारी करण्यास भाग पाडले आहे.

इंग्लंडच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीने देशातील सर्व प्रदेशांना आजपासून ते १३ ऑगस्ट च्या संध्याकाळ पर्यंत स्तर ३ उष्णतेचा इशारा दिला आहे.

या आठवड्यात युरोपात कमालीचे तापमान वाढण्याची शक्यता असल्याने हा इशारा देण्यात आला आहे. जरी यूके मध्ये तापमान जुलैमध्ये सेट केलेल्या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नसली तरी, शुक्रवारी लंडन, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम आणि यूके च्या संपूर्ण भागात थर्मामीटर मध्य ३० अंश सेल्सिअस (८६ अंश फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे पूर्व आणि पश्चिम मिडलँड्स एजन्सीने सांगितले.

उष्णतेचा आरोग्यावर जलद परिणाम होऊ शकतो. खास करून वयस्क नागरिक आणि लहान मुलांना आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा