पाकिस्तानावर अतीवृष्टीचे संकट

इस्लामाबाद, २६ ऑगस्ट २०२२ : पाकिस्तानावर सध्या एकुणातच संकटांचा पाऊस पडत आहे. नुकतीच अतीवृष्टीमुळे पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे पाकिस्तानात ९३७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. १४ जूनपासून सुरु असलेल्या या अतीवृष्टीमुळे ३०६ लोकांचा मृत्यू झाला. तसेच बलुचिस्तानमध्ये २३४ तर पंजाबमध्ये १८५ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आत्तापर्यंत हाती आली आहे. तर पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये ३७ लोकांचा मृत्यू झाला.

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटनें सांगितले आहे की, केवळ ऑगस्टमध्ये १६६.८ मिलीमीटर पाऊस झाला असून तो २४१ मिलीमीटर पर्यंत जाऊ शकतो.
पाकिस्तान हा मान्सूनच्या आठव्या मान्सूनच्या चक्रातून जात आहे. सर्वसामान्यपणे ही चक्रे चार असतात. पण यंदा अती पावसामुळे ही चक्रे आठपर्यंत पोहोचली आहे. सध्या पाकिस्तान हा असंभाव्य पावसाच्या संकटातून जात आहे. पाकिस्तानात आधीच आर्थिक प्रश्न भेडसावत असताना आता अतीवृष्टीमुळे पाकिस्तानी जनता त्रस्त झाली आहे.

पाकिस्तानातले रस्ते वाहून गेले आहेत. त्यातही पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचं चित्र सध्या पाकिस्तानात दिसत आहे. त्यामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत तब्बल ९०० पेक्षा जास्त व्यक्तींचा पावसाने बळी घेतला आहे.

पाकिस्तानच्या जनतेला घरे आणि मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे सगळ्यांनी मदत करण्याचं आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं. त्यामुळे आता पाकिस्तानचं हे संकट कधी शमणार, याची सगळेच वाट पहात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा