पुण्यात विजांच्या कडकडाटात गारांसह मुसळधार पाऊस

पुणे, २० एप्रिल २०२३: पुणे शहराला विजांच्या कडकडाटात आणि मेघगर्जनेसह आज पावसाने चांगलेच झोडपले. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर घामाघूम झालेल्या पुणेकरांना वरुणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.

अचानक झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले होते. दिवसा प्रचंड उष्णता जाणवत होती. मंगळवारपासून शहरातील कमाल तापमानाचा आकडाही चाळीसीमध्ये पोहचला होता. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाचे चटके अंगाला बसत होते.

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. कोथरूड, आंबेगाव पठार, कर्वेनगर, वारजे सह शहराच्या इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा