मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस

मुंबई, २९ ऑगस्ट २०२० : गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून आपली हजेरी लावली असून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पाऊस होत आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस पडत आहे. सध्या सर्व तलावात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा हे दोन मोठे तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत.

नवी मुंबई परिसरात दुपारपासून पावसाचा जोर वाढला असून तिथे सुमारे ७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातल्या सखल भागात पाणी साचलं असून वाशी विभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २२ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळित आहे.

अमरावती जिल्ह्यात रात्रीपासूनच पाऊस असून सकाळपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. मोर्शी इथल्या अप्पर वर्धा प्रकल्पाच्या धरणाचे पाच दरवाजे आज पहाटे चार वाजता वीस सेंटीमीटरनं उघडले आहेत. अप्पर वर्धा जलाशयाची पातळी ३४२ पूर्णांक २२ एवढे असून धरणात ९५ पूर्णांक ४७ टक्के जलसाठा आहे. धरणात येणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं १४६ घनमीटर प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची दारे उघडल्याने पर्यटकही मोर्शीलगत गर्दी करू लागले आहेत. धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस झालेला नाही.

गोंदिया जिल्हात मुसळधार पाऊस झाला. देवरी नाला रस्त्यावरून वाहात असल्याने आणि एक विशाल झाड पडल्याने आमगांव देवरी मार्ग सकाळ पासून बंद आहे. देवरी तालुक्यातुन वाहणारी बाघ नदी दुथळी भरून वाहत असून ह्या नदिवरिल सिरपुर धरण ८५ टक्के भरल असून सात दरवाजे २ फुटावर उघडण्यात आले आहेत.

जिल्यातील सर्वात मोठा इटायाडोह जलाशय ९० पूर्णांक २८ शतांश टक्के भरला आहे.तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला धापेवाड्या ब्यारेजचे २३ दरवाजे साडेचार मिटरनं उघडण्यात नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा