नांदेडमध्ये पावसाचे रौद्ररूप, देगलूर शहरासह परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नांदेड, २१ जुलै २०२३: सुगाव, वन्नाळी, लख्खा, सावरगाव, मनसकक्करगा व देगलूर शहरासह परिसरातील ढगफुटीमुळे रस्ते, शेती, घराच्या व जनावरांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. झालेल्या नुकसानीच्या तात्काळ भरपाईसाठी, शासकीय आर्थिक मदत देण्याचे व पूरग्रस्तभागात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांना दिले.

दरम्यान तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्यांचा सर्वाधिक फटका तालुक्यातील चातारी परिसरातील गावांना बसला आहे.

चालगणी कॅनल बोरी फुटल्यामुळे संपूर्ण गावाला पाण्याने विळखा घातल्याने अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. अचानक पाण्याचा लोंढा आल्याने ग्रामस्थांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले. मुसळधार पावसामुळे चातारी मधील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून गावाचा संपर्क तुटला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा