नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस, ३० ते ४० नागरिक बेपत्ता लोक वस्तीत शिरले पाणी

नाशिक, २ सप्टेंबर २०२२ ; नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला अचानक झालेल्या या पावसाने नागरिकांची त्रिधात्रिपट उडाली. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ३० ते ४० नागरिक बेपत्ता असून नदीकाठच्या लोकवस्ती मध्ये अनेक घरातून पाणी शिरले आहे.

या अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्रीपासूनच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी, मदत कार्य करण्यासाठी पोहोचल्या आहेत. पावसामुळे अडचणीच्या ठिकाणी अडकून बसलेल्या, नागरिकांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. यावेळी अनेक नागरिक जेसीबीवर बसलेले पाहायला मिळत आहेत. तेहतीस नागरिकांना पुराच्या पाण्यातून जेसीबीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील सरस्वती नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. ओढे ,नालेही तुडुंब भरून वाहत असून शहरातील विविध भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गाड्याही वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे.या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा