येत्या ५ दिवसात राज्यात या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, १२ जून २०२१: मान्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालीय. दोन-तीन दिवसांपूर्वीच मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलंच झोडपून काढलं होतं. त्यानंतर आता पुन्हा हवामान खात्याने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

१२ जून

उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, जिल्ह्यातील काही ठिकाणीमुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

१३ जून

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

१४ जून

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

१५ जून

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा