मुंबई, २० जुलै २०२१: राज्यात पावसाची मुसळधार सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुढचे ५ ते ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली आहे. रविवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी देखील जोरदार पाऊस झाला.
मान्सूनचा पाऊस येत्या ५ ते ६ दिवसांमध्ये रौद्र रुप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्याचा प्रदेश. मध्य महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं दिला आहे. पुढील ५ ते ६ दिवसांमध्ये या भागात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं १९ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे