२५ व्या वर्षी घरातच हेलिकॉप्टर बनवलं, ट्रायलवेळी झाला अपघात, तरुणाचा मृत्यू

यवतमाळ, १२ ऑगस्ट २०२१: घरीच हेलिकॉप्टर तयार करण्याचं स्वप्न बाळगणा-या एका ध्येयवेड्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या फुलसावंगी गावात ही घटना घडली आहे. केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने तयार केलेले हेलिकॉप्टर सरावादरम्यान पंखा तुटल्याने उड्डाण भरायच्या आधीच जमीनदोस्त झाले. या अपघातात शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिमचा जागीच मृत्यू झालाय.

इब्राहिम शेखने इतक्या लहान वयात चक्क हेलिकॉप्टर बनवलं होतं. तो पेशानं पत्रा कारागीर होता. लहानपणापासून बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरतंय असं वाटत असताना ते स्वप्न क्षणातच होत्याच नव्हतं झालं या हेलिकॉप्टरची ट्रायल सुरु होती. त्यावेळी आजूबाजूला इब्राहिमचे मित्रही होते. इब्राहिमने हेलिकॉप्टर सुरु केलं. त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी वेग घेतला. हेलिकॉप्टर हवेत झेपावणार असं वाटत असतानाच घात झाला. हेलिकॉप्टरचे पंखे तुटले. गंभीर जखमी झालेल्या इस्माईलचा यात मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी अशी ही दृश्यं आहेत.

फुलसावंगी या लहानश्या गावातील शेख इस्माईलने लहानपणी खेळण्यातले हेलीकॉप्टर उडवित असताना आपणही एक दिवस स्वतः पायलट बनून स्वत:च्या हेलीकॉप्टरने जगाची सफर करण्याचे स्वप्न रंगविले होते. आकाशात भरारी घेण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी मेक इन इंडियाअंतर्गत त्याने प्रयत्न सुरु केलेत.आठव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेला इस्माईल हा वेल्डिंग आणि फेब्रिकेन पत्रकारागिर असल्याने तो घरच्या कारखान्यात अलमारी, कुलर अशी उपकरणे बनवायचा. तर त्याचा भाऊ वेल्डर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा