हेमंत सोरेन होणार झारखंडचे मुख्यमंत्री ?

रांची : येथील झारखंड विधानसभा निवडणूक २०१९ चे निकाल जाहीर सोमवारी ( दि.२३) रोजी जाहीर झाले. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिला आहे.

हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं. काँग्रेस आघाडीने ८१ पैकी ४७ जागा मिळवत विजय खेचून आणला. सत्ताधारी भाजपला केवळ २५ जागांवर समाधान मानावं लागलं. झारखंडमध्ये ४१ हा बहुमताचा आकडा आहे.
या विजयानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आहे.
महाआघाडीचे नेते हेमंत सोरेन येत्या २७ डिसेंबरला झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अशी माहिती रांचीतील मोराबादी मैदानात हेमंत सोरेन यांच्यासह जेएमएमचे ६, काँग्रेसचे ५ आणि आरजेडीचा १ आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल. म्हणजे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याशिवाय १२ सहकारी असतील.

महत्त्वाचं म्हणजे भाजप नेते रघुवर दास यांचं सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. रघुवर दास यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. जमशेदपूर पूर्व या जागेवरुन रघुवर दास निवडणुकीच्या रिंगणात होते.
या मतदारसंघाचा निकाल सर्वात शेवटी जाहीर झाला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रघुवार दास यांचा१५,८३३ मतांनी त्यांचा पराभव झाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा