तिचा “नवरा”आला आणि बाल्कनीतून प्रियकर खाली पडला…..

भंडारा, २७ जानेवारी २०२१: आजकाल च्या काळात अनैतिक संबंध हि सौम्य गोष्ट झाली आहे. याच प्रकरणात वेगळ्या आणि विचित्र घटना देखील घडत असतात. ज्या कधी जिवावर ही बेतू शकतात याची कल्पना व्यक्तीला नसते. मात्र अशीच घटना घडलीये महाराष्ट्राच्या भंडाऱ्यामधे. भंडारा लगतच्या गणेशपूर येथील मेहर आपार्टमेंट मध्ये हि घडली असून व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

विवाहित प्रेयसीला मध्य रात्री तरूण भेटायला गेल्या नंतर अचानक तिच्या नवर्याची बेडरूम मधे एण्ट्री झाली आणि तरूणाचा गोंधळ उडाला व त्या गोंधळाच्या भरात तो बाल्कनीतून रस्त्यावर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. सध्या प्रियसीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. महेश डोंगरवार असे मृत तरूणाचे नाव आहे.

बेडरूममध्ये दोघे नको त्या अवस्थेत होते.त्या वेळी प्रियसीच्या पतीने बेडरूमचा दरवाजा ठोठावला आणि दोघांमधे एकच गोंधळ उडाला. महेश ने घाईगडबडीत कपडे धरून बाल्कनीत धूम ठोकली आणि बाहेरच्या बाजूने बाल्कनीच्या दरवाजा लावला.

आतून दरवाजाच्या जास्त आवाज येत आसल्यावर तो खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागला व त्यात त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जबर मार बसल्यामुळे महेशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाजात समोर आले आहे.

सध्याच्या काळात रिलेशन शिप सारख्या नाजूक धाग्याला समाज बंधनांचा पुढे जाऊन काही वागत आहेत. अश्या वागण्यामुळे एक कुटुंब उध्वस्त न होता. अनेक कुटुंब उध्वस्त होत आसतात.याचे साधे भान ही त्यांना नसते, त्यामुळे अश्या घटना घडत आसतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा