नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत शुक्रवारी एक मोठं विधान केलं. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं की, येत्या काही आठवड्यात भारताला ही लस मिळू शकेल, देशातील शास्त्रज्ञ मोठ्या यशाच्या जवळ आहेत. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी लसीची किंमत, तिचं वितरण आणि राज्यांसह समन्वय यावर उघडपणे बोलले. सर्वपक्षीय बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी लसीबद्दल काय म्हटले, दहा मोठ्या गोष्टी जाणून घ्या …
१. भारत ही लस बनवण्याच्या अगदी जवळ आहे आणि देशातील शास्त्रज्ञ खूप उत्सुक आहेत. देशाला पुढील काही आठवड्यांतच ही लस मिळू शकंल.
२. देशातील एकूण आठ लसींवर चाचणी सुरू आहे, कारण ३ लसी भारतात तयार केल्या जात आहेत, तर जगातील अनेक लसींचे उत्पादन भारतात होणार आहे.
३. भारतानं को-वीन एक विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ज्यामध्ये सामान्य लोक कोरोना लसीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. तसेच लसींचा साठा किती आहे हेदेखील जाणून घेऊ शकतात.
४. राष्ट्रीय तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या म्हणण्यानुसार या गटात केंद्रातील लोक, राज्य सरकारचे लोक आणि तज्ञ यांचा समावेश आहे. हा गट एकत्रितपणे कोरोना लसीच्या वितरणाविषयी निर्णय घेईल.
५. वृद्ध, कोरोना वॉरियर्स आणि अधिक आजारी लोकांना कोरोनाची लस प्रथम दिली जाईल. वितरणासाठी धोरण तयार केले जाईल, ज्या अंतर्गत वेगवेगळे टप्पे असतील.
६. लसीची किंमत काय असेल यावर केंद्र आणि राज्ये एकत्रितपणे निर्णय घेतील. दराबाबत निर्णय लोकांना विचारात घेऊन घेतला जाईल आणि त्यात राज्य भाग घेईल.
७. केंद्र आणि राज्य संघ एकत्रितपणे लस वितरित करण्यासाठी कार्य करतील. जगातील लस वितरित करण्याची उत्तम क्षमता भारतामध्ये आहे.
८. देशाच्या कानाकोपऱ्यात लसी देण्यासाठी कोल्ड चेन चे जाळे बळकट करावे लागेल. यावर केंद्र आणि राज्य एकत्र काम करत आहेत.
९. भारताची आजच्या स्थितीला त्या देशांमध्ये गणना होत आहे, जिथे दररोज जास्तीत जास्त चाचणी होत आहे. तसेच, रिकवरी प्रमाणही सर्वाधिक असून मृत्यूची संख्याही कमी होत आहे.
१०. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात विकसनशील देश देखील हतबल झाले आहेत, परंतु भारतानं एक राष्ट्र म्हणून एक मोठं काम केलं आहे. राजकीय पक्षांनी लस वितरणाशी संबंधित कोणत्याही अफवा पसरविणं थांबवावं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे