राकेश झुनझुनवाला यांच्या पहिल्या विमानाची झलक आली समोर, जाणून घ्या कधी होणार पहिलं उड्डाण

मुंबई, 24 मे 2022: देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात लवकरच खळबळ उडणार आहे. एअर इंडिया आधीच टाटा समूहाचा एक भाग बनली आहे आणि त्यानंतर सेवेत सुधारणा दिसून येऊ लागली आहे. खाजगी कंपनी जेट एअरवेज पुन्हा लॉन्च होणार आहे. याशिवाय राकेश झुनझुनवाला यांची इन्व्हेस्टमेंट एअरलाइन कंपनी अकासा एअरलाइनही लवकरच उड्डाण करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी अकासा एअरलाइनने सोमवारी आपल्या विमानाचे पहिले छायाचित्र सार्वजनिक केले.

कंपनीने या विमानाचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. एका इमेज मध्ये संपूर्ण विमान दिसत आहे, जे केशरी आणि पांढर्‍या रंगात आहे तर एअरलाइनचे नाव निळ्या रंगात लिहिलेले आहे. या फोटोसोबत कंपनीने कॅप्शन दिले की, ‘Can’t keep calm! Say hi to our QP-pie! 😍.’ दुसर्‍या ट्विटमध्ये कंपनीने विमानाचा फ्रंट लुक शेअर केला आहे, ज्यामध्ये What do YAA think? 😎 निळ्या रंगात लिहिलेले दिसत आहे.

या महिन्यापासून सुरू होणार उड्डाणे

आकासा एअर या वर्षी जुलैपासून व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करत आहे. कंपनीला एक ‘क्यूपी’ कोड देण्यात आला आहे, त्यानंतर कंपनीने एक चित्र पोस्ट केले होते, ज्यावर लिहिले होते, ‘क्यूपी, आता तर पार्टी सुरू झाली आहे.’ यासोबत कंपनीने कॅप्शन दिले होते… आपला एअरलाइन कोड ‘QP’ जाहीर करताना अभिमान वाटतो.

बोईंगकडून इतकी विमाने खरेदी करणारी कंपनी

आकासा एअरलाइनची उड्डाणे सुरू होण्यास विलंब होऊ शकतो, असे याआधी बातम्यांमध्ये सांगण्यात आले होते. विमानांची डिलिव्हरी पुढे ढकलल्यामुळे कंपनीला हा विलंब होत आहे. त्यानंतर कंपनीने सांगितले की जूनच्या सुरुवातीला पहिले विमान मिळेल. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीपासून कामकाज सुरू करता येईल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच कंपनीला सरकारकडून एनओसी मिळाली होती. कंपनी बोईंगकडून ७२ बोईंग 737 मॅक्स विमान खरेदी करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा