पुणे, १४ डिसेंबर २०२२: आज रात्री एक अद्भुत खगोलीय घटना घडणार आहे. दर तासाला १२० उल्का पडतील. याला जेमिनिड उल्कावर्षाव म्हणतात. भारतातील लोक हा उल्का वर्षाव संध्याकाळी ६.३० नंतर पाहू शकतात. मात्र त्यासाठी आकाश निरभ्र असणं आवश्यक आहे.
संध्याकाळी अंधार पडल्यानंतरच उत्तम दृश्य दिसेल. ४ डिसेंबर २०२२ पासून जेमिनिड उल्कापाताचा पाऊस सुरू झालाय. १७ डिसेंबर रोजी संपणार आहे. या संपूर्ण काळात आकाशात उल्कांचा वर्षाव होताना दिसंल. परंतु १४ डिसेंबरची रात्र सर्वात सुंदर असंल. या उल्का मिथुन नक्षत्रातून येत आहेत.
१४ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत हे नयनरम्य दृष्य पाहता येईल. म्हणजेच, टेरेस किंवा बाल्कनीवर बसून, हिवाळ्यातील सर्वोत्तम कपडे घालून आणि चहा घेऊन तुम्ही या खगोलीय घटनेचा आनंद घेऊ शकता. पृथ्वी प्रदक्षिणा करताच उल्कापाताचा वर्षाव इतर देशांना दिसंल. तुमच्या नजरेतून गायब होत जाईल. हा उल्का वर्षाव दिवसा होत असला तरी सूर्यप्रकाशामुळं तो पाहता येणार नाही.
आकाश जितकं स्वच्छ होईल. अंधार होईल… उल्कापाताचा हा पाऊस अगदी स्पष्टपणे दिसंल. जर तुमच्याकडं टेलिस्कोप असंल तर तुम्ही तो वापरू शकता. जेव्हा पृथ्वी सूर्याच्या कक्षेत पोहोचते, जिथं उल्कापिंडांचा मोठा पट्टा असतो तेव्हा उल्कापाताचा पाऊस दिसून येतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं जेव्हा या उल्का आपल्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा त्या जळताना दिसतात. आभाळातून पाऊस पडतोय असं वाटतं.
जेमिनिड उल्कावर्षाव हा खडकाळ धूमकेतू ३२०० फेथॉनने (3200 Phaethon) मागं सोडलेला खडकाळ कचरा आहे. हा धूमकेतू ५.८ किलोमीटरचा खूप मोठा आकाश दगड आहे. जेव्हा हा धुमकेतू सूर्याजवळून जातो, तेव्हा त्याचे तुकडे होण्याचा वेग वाढतो. अंतराळात ते उल्कापिंडाच्या स्वरूपात तयार होतात. पृथ्वी त्यांच्या जवळ आली की उल्का वर्षाव होतो. फेथॉनमधून बाहेर पडणारे दगड १.२७ लाख किलोमीटर प्रतितास या वेगानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे