हिरो सायकल कंपनीने चिनी कंपनी सोबत केलेल्या कराराला लावला ब्रेक

नवी दिल्ली, दि. ५ जुलै २०२०: सध्या चीन आणि भारत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. या दरम्यान गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर पूर्ण देशांमधून तीव्र निषेध करण्यात येत आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर सरकारसह पूर्ण भारतातील जनतेने आता चिनी वस्तूंवर व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. सरकारने देखील आता चीनला आर्थिक मोर्चावर धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान सायकल बनवणाऱ्या उद्योगातील भारतातील मोठी कंपनी हिरो सायकलने देखील चीनी कंपनीला असाच आर्थिक धक्का दिल्याचे समोर आले आहे. हिरो सायकल कंपनीने चीन सोबतचा आपला भावी ९०० कोटींचा करार रद्द केला आहे.

केवळ इतकेच नाही तर हिरो सायकल कंपनी ने कोविड -१९ चे युद्ध लढण्यासाठी सरकारला १०० कोटींची मदत देखील केली आहे. विशेष म्हणजे कोविड -१९च्या काळात सर्वच कंपन्या डबघाईला आल्या आहेत अशा स्थितीत देखील हिरो सायकल वेगाने धावताना दिसत आहे. या संकट काळामध्ये देखील कंपनीची आर्थिक स्थिती इतर कंपन्यांच्या तुलनेत व्यवस्थित आहे. यातच आता हिरो सायकल कंपनी ने चीन सोबत चा आपला करार रद्द करून देशासाठी दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. चिनी कंपनीसोबत हिरो सायकलचा होणारा हा व्यवहार पुढील तीन महिन्यात पर्यंत होणार होता.

हिरो सायकलने चीनसोबतचा आपला सर्व प्रकारचा व्यापार बंद केला असून कंपनीने जर्मनीत नवीन प्लांट सुरू करण्याची तयारी केल्याची बोलले जातं आहे. लॉकडाउनमध्येही हिरो सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यानुसार कंपनीने आपली क्षमता वाढवली अशून उत्पादनात वाढ केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा