कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर हीरो इंडियन ओपन गोल्फ स्पर्धा रद्द ; आयजीयू

नवी दिल्ली, ३ जुलै २०२० : कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे देशातील सर्वात मोठी गोल्फ स्पर्धा हीरो इंडियन ओपन शुक्रवारी रद्द झाली. युरोपियन टूरने सह-मंजूर केलेली ही स्पर्धा यापूर्वी गुरुग्राममध्ये १९ ते २२ मार्च दरम्यान होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली. मंगळवारी साथीच्या आजारामुळे महिला इंडियन ओपन देखील रद्द करण्यात आली.

इंडियन गोल्फ युनियन (आयजीयू) चे अध्यक्ष देवांग शहा यांनी पीटीआयला सांगितले की, “प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षा यांना सर्वात जास्त प्राधान्य असल्याचे लक्षात घेऊन आम्ही यंदाचा हिरो इंडियन ओपन गोल्फ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.आमचा सहभागीदार युरोपियन टूरशी उचित सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे.” शहा म्हणाले की “त्यांनी ऑक्टोबरमध्ये कधीतरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची योजना आम्ही आखली होती पण देशातील कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम रद्द करणे आम्हाला भाग पाडले गेले. “हे दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे, त्यामुळे आम्ही युरोपियन टूरशी सल्लामसलत करून यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा २०२१ मध्ये होईल,” असे ही शाह म्हणाले.

आयजीयूचे कार्यकारी अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डी अंबू (निवृत्त) म्हणाले की हा एक अतिशय कठोर निर्णय होता परंतु प्रत्येकाच्या हिताचा विचार करून हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. “हा एक अतिशय कठीण निर्णय होता, परंतु सध्याच्या सर्वत्र पसरलेल्या साथीच्या आजाराच्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेता येत नाही. भविष्यात कोणत्याही विश्रांतीची शक्यता नसल्याने सर्व खेळाडू, अधिकारी व प्रेक्षकांचे आरोग्य व हित जपणे फारच महत्त्व आहे. ,” असे ते म्हणाला.

हीरो इंडियन ओपनची स्थापना आयजीयूने १९६४ मध्ये केली होती आणि ही देशातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. २०१५ पासून ही युरोपियन टूर-मंजूर स्पर्धा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा