इस्लामाबाद, १७ डिसेंबर २०२०: भारताच्याच पोटातुन जन्मलेल्या पाकिस्तान मधे सुरूवातीपासूनच गरिबी मधे जगत आहे. पाकिस्तान नेहमीच भारताच्या अंतर्गत कामात आपलं बिनकामी नाक खुपसत आसतो. पण, स्वताच्या जनतेवर अजिबात लक्ष्य देत नाही.म् हणूनच तेथील जनता हि सरकारला नेहमी कोसत आसते.
इम्रान खान च्या ‘नव्या पाकिस्तान’ मधे महागाई सातव्या नाही तर हजाराच्या आसमानावर आहे. हो खरं वाचलत तिथे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडेच नाही सर्वच हाडे मोडली आहे. रावळपिंडी येथे एक किलो आल्याची किंमत १ हजार रुपये आहे. तर शिमला मिर्चीची किंमत २०० रुपये प्रति किलो आहे. आलं, शिमला मिर्चीपासून सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडलेयत. असे असले तरीही इम्रान खान सरकार स्वताच आपली वा वाही करताना दिसत आहे.
इम्रान खान यांची जुनी पत्नी रेहम खान यांनी एका न्यूज चॅनलचा व्हिडीओ ट्वीट केला आणि पाकिस्तानमधील वाढत्या महागाईला इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे. चुकीच्या निर्णयांमुळेच हा परिणाम झाल्याचं म्हटलं जातयं.
पाकिस्तान मधे साखर ८१ रुपयांनी विकली जात असल्याचे विधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. सरकारच्या योग्य रणनितीमुळे १०२ रुपयांनी विकली जाणारी साखर ८१ रुपयांमध्ये विकली जातेय. पाकिस्तानात महागाई वाढत असली तर इम्रान खान या सर्व प्रकरणांवर शांत दिसतात.
पाकिस्तानमध्ये गहुंच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडलेयत. काही दिवसांपूर्वी पिठाच्या किंमती वाढल्याने पाकिस्तानात गोंधळ निर्माण झाला होता. इम्रान खान यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या डिसेंबरमध्ये गहूची किंमत २००० रुपये प्रति ४० किलो होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा रोकॉर्ड तोडला.
मध्यतंरी ईद मधे पाकिस्तान मधे मटणाचे भाव २००० रूपयला भिडले होते. तर टमाटर ८०० रू किलो ने विकले जात होते आणि पाकिस्तान मधील जनता तशीही इम्रान खानच्या विरोधात नारेबाजी करतच आसतात. पण, सरकारला याचा काही फरक पडत नसल्याचे दिसते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव