जम्मू-काश्मीरमध्ये दीड वर्षानंतर हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुन्हा सुरू

जम्मू-काश्मीर, ६ फेब्रुवरी २०२१: संपूर्ण जम्मू-काश्मीर मध्ये 4G मोबाइल इंटरनेट सेवा पुनर्संचयित करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश जम्मू-काश्मीर प्रशासनाने जारी केला आहे. ५ ऑगस्ट २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये 4G मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. इंटरनेट पुनर्संचयित करण्याच्या या आदेशानंतर जम्मू-काश्मीरमधील लोक आता हाय स्पीड इंटरनेट वापरू शकतात. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी सीएम उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन ‘4G मुबारक’ म्हणत जनतेला शुभेच्छा दिल्या.

जम्मू-काश्मीरचे माजी सीएम उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, ‘ऑगस्ट २०१९ नंतर प्रथमच संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये 4G मोबाइल डेटा सेवा पुनर्संचयित केली गेली. उशिका का असेना पण एक महत्त्वपूर्ण निर्णय’.

वास्तविक, शुक्रवारी (५ फेब्रुवारी) अधिकाऱ्यांनी जाहीर केले की ५ ऑगस्ट २०१९ पासून संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये 4G मोबाइल इंटरनेट सेवा पुनर्संचयित केली जात आहे. पीडीडीचे प्रधान सचिव व माहिती रोहित कंसल यांनी ट्वीटद्वारे ही घोषणा केली. तसेच कंसल हे सरकारचे प्रवक्तेही आहेत.

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ पासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी जानेवारीत टूजी सेवा पूर्ववत करण्यात आली. पण आता जम्मू-काश्मीर प्रशासनाने सामान्य जीवन परत रुळावर आणण्यासाठी 4G इंटरनेट सेवा पूर्णपणे पुनर्संचयित केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा