टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री कोण माहित आहे का?

Highest Paid Actress in Indian Television Industry

Highest Paid Actress in Indian Television Industry: टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठा असतो. त्यांच्या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. टीव्ही इंडस्ट्रीतून कलाकारांना लोकप्रियता तर मिळतेच, पण त्याचसोबत ते चांगला पैसाही कमावतात. सध्या टीव्हीवर रुपाली गांगुली आणि तेजस्वी प्रकाश यांचं नाणं खणखणीत वाजतंय.

रुपालीची अनुपमा ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी असते. तर तेजस्वीनेही ‘नागिन’ आणि ‘बिग बॉस’सारख्या शोजमधून चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. परंतु या सर्वांत एक अभिनेत्री अशी आहे, जी कमाईच्या आणि संपत्तीच्या बाबतीत या दोघींनाही मागे टाकू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून तिने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्वेता तिवारी आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. श्वेताची एकूण संपत्ती 81 कोटी रुपयांच्या घरात आहे. विविध शोज आणि जाहिराती यांमधून ती चांगला पैसा कमावते. श्वेता स्टेज शोजसुद्धा करते. यासोबतच तिने ‘बिग बॉस 4’चं विजेतेपदही पटकावलं आहे. श्वेताने ‘कसौटी जिंदगी की ‘मेरे डॅड की दुल्हन’, ‘बेगुसराय’, ‘इस जंगल से मुझे बचाओ’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. टीव्ही विश्वात तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

इतर कलाकारांविषयी बोलायचं झाल्यास, एक्स ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीची संपत्ती 20 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय. तर तेजस्वी प्रकाश 25 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. आणि’ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची संपत्ती 40 कोटी रुपये असल्याचं कळतंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर