भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पहायला मिळत आहे. ज्यामुळे भारत सरकार समोर कोरोनाला आटोक्यात आणण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणुन घेणार आहोत.
भारतात १४ लाखांवर ॲक्टीव्ह रूग्ण…..
भारतातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ॲक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या १४ लाखांच्या वर गेली आहे. भारतात सलग ३६ व्या दिवशी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे. सध्या देशात उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या १४,७१,८७७ वर पोहचली आहे. जे एकूण संक्रमणापैकी १०.४८ टक्के आहे.
सतर्कतेचा इशारा….
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासात भारतात २,००,७३९ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर ९३,५२८ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. १,०३८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्सिजन…..
राज्यात जरी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आसला तरी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या ५० हजार मॅट्रिक टन साठा आहे.
महाराष्ट्र हाॅटस्पाॅट…..
संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर महाराष्ट्रात आढळलेल्या ३६१ कोव्हिड सेंपलमध्ये डबल म्युटेंटचे प्रमाण ६१ टक्के आहे.
देशात किती नागरिकांना कोरोना लस मिळाली…..
१४ एप्रिल २०२१ पर्यंत भारतात ११.४५ कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली.गेल्या २४ तासात ३३.१४ लाख लोकांना लस देण्यात आली.तर १३ एप्रिल ला २६.४६ लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव