रत्नागिरी-कोल्हापूर दरम्यानचा महामार्ग बंद, ‘या’ मार्गाने पर्यायी वाहतूक

रत्नागिरी, ३० जून २०२३: राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस जोरदार सुरू आहे. पावसामुळे ठिकठिकाणी परिणामही झाल्याचे दिसतय. आज झालेल्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील, रत्नागिरी तालुक्यात असणाऱ्या पाली ते साखरपा गावादरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार या राज्य महामार्गाची दुरुस्ती होईपर्यंत, हा रस्ता बंद करण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाने रस्ते खचले आहेत. खड्डे पडले आहेत. याचा परिणाम वाहतूक मार्गावरही झालाय. माहितीनुसार रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील रत्नागिरी तालुक्यात पाली ते साखरपा गावादरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचला आहे. या कारणामुळे हा राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग, मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा-दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे. आणि कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा-लांजा मार्गाने वळविण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा