वाडेबोलाइ: २५ जुलै २०२० : येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पावसामुळे वाडेबोलाई उरुळीकांचन रस्त्यावर बिबरी गावाच्या हद्दीत असलेल्या गोते मळा येथे पावसाच्या जोरदार वाहत्या पाण्याने सात वाजण्याच्या सुमारास रस्ता वाहून गेला आहे.
त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी वाडेबोलाई उरुळीकांचन रस्ता मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. येथे रस्त्यावरील डांबरी खालील रस्ता पूर्णतः खचला असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पीएमआरडीए विभागाच्या वतीने नुकतेच काम चालू असलेल्या वाडेबोलाइ ते कोरेगाव मुळ रस्त्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने काम झालेला गोते मळा ते अष्टापुर रस्ता, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झालेला माळवाडी ते जगताप वस्ती हे प्रमुख तीन रस्ते जोरदार पडलेल्या पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत.
या तीन वाहून गेलेल्या रस्त्याची मजबूत दुरुस्ती होईपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात येणार असून त्यामुळे वाडेबोलाई पंचक्रोशी परिसरातील शिरसवाडी, अष्टापुर, डोंगरगाव, पेरणी, उरुळी कांचन, पंचक्रोशी परिसरातील कोरेगाव मुळ, नायगाव पेठ, या गावातील नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग बंद झाल्याचे पंचायत समितीचे सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले .
आज या पावसाने वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी जिल्हा परिषद सदस्य कल्पना सुभाष, जगताप जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता बाळासाहेब ठाकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, बिबरीचे सरपंच सुधीर गोते, शिरस वाडीचे माजी सरपंच संदीप गोते, वाडेबोलाईचे माजी उपसरपंच संजयराव बोरडे अंकुश गोते, पीएमआरडीए बांधकाम खात्याचे अधिकारी वाडेबोलाई विभागाचे तलाठी सचिन मोरे यांनी पाहणी केली. याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख माऊली ढबळे, संजय चव्हाण, विकास कोतवाल, विकास कटके, उमेश कोतवाल, हरिदास गोते, चेतन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गोते, उपस्थित होते.
आधी नागरिकांनी रस्ता पहाण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य कल्पना सुभाष जगताप, म्हणाल्या जोरदार झालेल्या पावसामुळे रस्ते वाहून गेले असून या रस्त्याची प्रत्यक्षात येऊन पाहणी व पंचनामे हे पीएमआरडीए जिल्हा परिषद पंतप्रधान ग्रामसडक योजना व रस्ते बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही त्वरित मजबूत पद्धतीने करून द्यावी त्यामुळे आमच्या भागातील नागरिकांचे दळणवळण पुन्हा सुरळीत चालू राहील. याबाबत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. असे जगताप यांनी बोलताना सांगितले. आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामे करून रस्त्याची त्वरित मजबूत बांधकामे व दुरुस्ती करावी अशी जिल्हा परिषद सदस्य कल्पना सुभाष जगताप व ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे