नवी दिल्ली(वृत्तसंस्था): दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८ हजार फुटांवर हिमस्खलन होऊन भारताचे दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती मिळत आहे.
आज पहाटे हे जवान गस्त घालत असताना हि घटना घडली.
दरम्यान, हिमकडा कोसळल्याने यामध्ये दबललेल्या गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या मदतीने काम सुरु केले आणि जवानांना बाहेर काढले. मात्र यामध्ये २ जवान शहिद झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान याआधी सुद्धा १८ नोव्हेंबर रोजी देखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाच्या तावडीत सापडले होते.त्यात चार जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता.