हिमवृष्टीनंतर उत्तर भारतात थंडी

नवी दिल्ली: नोव्हेंबरमध्येच थंडीला सुरूवात झाली होती, परंतु काल सायंकाळपासून झालेल्या पावसाने तापमान ७ ते ८ अंशांवर आणले आहे. डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी आणि समतल भागावर पडलेल्या मुसळधार पावसामुळे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. पश्चिम भागातील हवामानात झालेल्या बदलामुळे अचानक पाऊस झाला असून हवामान खात्याचे म्हणणे आहे की काही भागात पुढील तीन दिवस पाऊस सुरू राहू शकेल.
हवामान खात्याच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील निम्म्याहून अधिक भागात दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या उंच भागात बुधवारी मध्यम हिमवृष्टी झाली, तर श्रीनगर आणि जम्मूच्या मैदानावर गुरुवारी दुपारपासून पाऊस पडत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा