गोल पोस्ट राष्ट्रीय हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दुपारी
भरदिवसा अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
कमलेश तिवारी यांना
तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणारे
हल्लेखोर फरार झाले आहेत.
मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर त्याच्या विरोधात नाराजी ही व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या हत्ये नंतर लखनऊमध्ये प्रचंड तणाव निर्माणझाला असून बाजारपेठेतील दुकानंही बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला
जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास १०० हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही.
घटना घडल्यावर अध्य्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकराने सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version