पुणे: शिवसेना व भाजप हे दोन्ही समान मत विचारांचे होते. हिंदुत्व हे दोन्ही पक्षांमध्ये साम्य होते. परंतु सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडी नुसार भाजप व राष्ट्रवादी हे दोन भिन्न विचारांचे पक्ष फक्त स्थापनेसाठी एकत्र येत असल्याचे दिसत आहे.
भाजपने सत्तास्थापनेसाठी हिंदुत्व चे तत्व सोडल्या मुळे पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक साधली आहे. अशी टीका हिंदू महासभेचे अध्यक्ष अनुप केणी यांनी केली. राज्यात ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे लवकरच सरकार स्थापन होणे आवश्यक होते. भाजपने शिवसेनेसोबत तोडजोड करून सत्ता स्थापन करायला पाहिजे होती. त्यामुळे दोन्ही पक्षांची हिंदुत्वावर आधारित युती कायम राहिली असती, पण दोन्ही पक्षांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून आपले हिंदुत्व कसे बेगडी आहे हे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी आणि भाजप किंवा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार आले तरी हे दोन्ही भिन्न मतांचे पक्ष आहेत. असे सरकार महाराष्ट्रात किती स्थिरता अनेल हा मोठा प्रश्न आहे.