‘हिंदुस्थान जिंदाबाद है… जिंदाबाद था… और जिंदाबाद रहेगा!’

मुंबई, २६ जानेवारी २०२३ : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एका देशभक्तीपर चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘गद्दार २’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. झी स्टुडिओ निर्मित ‘गद्दार २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या ‘गद्दार’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

‘हिंदुस्थान जिंदाबाद है… जिंदाबाद था… और जिंदाबाद रहेगा!’ या स्वातंत्र्यदिनी, दोन दशकांनंतर आम्ही तुमच्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत, असे कॅप्शन देत सनी देओलने ‘गद्दार २’ चित्रपटाची जोरदार घोषणा केली आहे. पोस्टरमधील सनी देओलचा लूक पाहता भावना, संवाद आणि देशभक्ती याचे हा चित्रपट उत्तम उदाहरण ठरू शकतो, अशी शक्यता चाहत्यांनी कमेंट्सद्वारे वर्तविली आहे. भारताचा खरा देशभक्त, ॲक्शनचा बादशहा, उत्तम शब्दफेक करणारा हिरो अशा शब्दांत सनी देओलची प्रशंसा केली गेली आहे.

झी स्टुडिओज बरोबरच अनिल शर्मा प्रोडक्शन ॲण्ड एम. एम. मुव्हीज हे चित्रपटाचे निर्माते असून, अनिल शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाचे संगीत मिथुन यांनी केले आहे. तर सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. ‘गद्दार’ या चित्रपटाचा हा सिक्वेल म्हणजेच ‘गद्दार २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा