मुंबई, 6 फेब्रुवारी 2022: विद्यार्थ्यांचं आंदोलन भडकवल्या बद्दल सोशल मीडियावर चर्चेत असलेला हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला अटक करण्यात आली होती. त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. काल पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने हिंदुस्तानी भाऊचा तुरुंगातील मुक्काम आता आणखी वाढलाय.
विकास पाठक याला काल न्यायालयात हजर करण्यात आल्यावर अधिक चौकशीसाठी पोलीस त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या मुद्द्यावर विकास पाठक ने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये तो विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करत असल्याचं निदर्शनास आलं.
हिंदुस्थानी भाऊच्या मागं कोणी राजकीय संस्था आहे का? तसेच त्याला आर्थिक मदत कुठून मिळाली याचा याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडकवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे