नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर प्रवेश बंदी

नगर : कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके ठेवण्याचा निर्णय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील २९ ऐतिहासिक ठिकाणे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
औरंगाबाद मंडळात येणार्‍या सर्व जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू बंद ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यातील या ऐतिहासिक ठिकाणांवर पर्यटकांची दिवसभर रेलचेल असते. ते लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयामार्फत आदेश येताच स्थानिक अधिकार्‍यांनी ही ठिकाणे बंद केली आहेत.
बंद असलेल्या ठिकाणांमध्ये नगर शहरातील दमडी मशीद, फराहबख्क्ष महाल, बारा इमाम, चांदबिबी महाल, मक्का मशीद, दो बोटी चिरा, बागरोजा ही ऐतिहासिक स्मारके आहेत.
तसेच जिल्ह्यातील कर्जत व पारनेरमधील प्रत्येकी दोन, श्रीगोंद्यातील चार, अकोल्यातील तीन, संगमनेर, कोपरगाव, राहुरी व पाथर्डीतील प्रत्येक एक स्मारक आहेत. या स्मारकांना इतिहास संशोधक, अभ्यासक व पर्यटक दिवसभर भेटी देत राहतात. त्याची दखल घेऊन आणि कोरोना विषाणुच्या प्रार्दभावाच्या पार्श्वभूमीवर ही स्थळे आता पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा