मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२०: डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करून जो बिडेन हे अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. मात्र अमेरिकेत आता मदत पॅकेज येण्याची आशंका जवळपास सोडून दिली जात आहे. अशा परिस्थितीत बाजारात तरलता कायम ठेवण्यासाठी, संपूर्ण भार फेडरल रिझर्व्हवर पडेल, यासाठी ते व्याजदरात कपात करतील त्याखेरीज कोणताही पर्याय शिल्लक नाही. अशा परिस्थितीत, व्याज दर बर्‍याच काळासाठी कमी राहतील अशी अपेक्षा आहे, जी बाजारासाठी चांगली गोष्ट आहे. याचाच परिणाम आज मुंबई शेअर बाजारामध्ये ऐतिहासिक वाढ दिसून आली.

आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजराच्या निर्देशांकानं थेट ६७३ अंकांनी उसळी घेतली. ४२,५०० पेक्षा जास्त अंकांसह निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकाजवळ पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा १८० पेक्षा जास्त अंकांसह १२,४५० च्या पुढं गेला. बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. नजीकच्या काळात अनेक कंपन्यांनी आपला तिमाही निकाल देखील चांगला सादर केला आहे. बँकिंग क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर बँक निफ्टी गेल्या काही दिवसात सातत्यानं वाढत आहे. खास करून एसबीआयच्या तिमाही निकालानंतर बँक इंडेक्स मध्ये मोठी वाढ दिसून आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा