टोकियो ऑलिम्पिंकमध्ये भारताला अँथलेटिक्समध्ये सुवर्णपदक, शेवटचा दिस गोड झाला. त्याने स्वप्न पाहिलं, तो स्वप्न जगला आणि त्याने सुवर्णपदक जिकलं. हे शब्द आज भारतासाठी खरे ठरले आणि भारतीयांच्या शीरपेचात त्याने मानाचा तुरा खोवला. भारताच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण २००८ नंतर आज पुन्हा भारतीयांना अनुभवायला मिळाला. याचे कारण म्हणजे भारताचा अँथेलेट नीरज चोप्रा. आज शेवटच्या दिवशी त्याने ऑलिम्पिकमध्ये भारताला एथलेटिक्समध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून दिलं आणि ख-या अर्थाने आजचा दिवस सोनेरी दिवस केला. तब्बल १३ वर्षानंतर एथलेटिक्ससारख्या खेळाला भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा नेमबाज अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा खेळाडू ठरला.
एकुणच भारतासाठी या वर्षीचे ऑलिंम्पिक स्मरणदायी ठरले. याचे कारण म्हणजे खेळाडूंनी भारतासाठी दिलेले योगदान. जे जिंकले ते तर जिंकले कले. मात्र जे खेळाडू हरले ते ही जिंकले. कारण त्यांची जिद्द कायम होती. त्यांनी आम्ही लढू शकतो हे दाखवूनही ऑलिंपिक गाजवलं. यंदा भारताला ऑलिंम्पिकमध्ये एकूण सात पदकं मिळाली. त्यात १ सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकाचा समावेश आहे.
भारताला यंदा मेडल मिळवण्याची सुरुवात ऑलिंम्पिकच्या पहिल्याच दिवशी झाली. मीराबाई चानू हिने पहिल्या दिवशी महिला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून भारताची चांगली सुरुवात केली. रेसलिंगमध्ये रविकुमार दहिया याने ५७ किलोच्या गटात रौप्य पदक मिळवले. पी.व्ही सिंधू हिने बॅडमिंटनमध्ये कास्यपदक मिळवून भारताची मान उंचावली. मुष्टीयुद्धात लोव्हलिना बोगोहेन हिनेदेखील कास्यपदक मिळवून भारताच्या पदकांची गणती वाढवली.
भारताच्या पुरुष हॉकी टीमला कांस्यपदक मिळाले. तर शेवटच्या दिवशी बजरंग पुनिया यानेही कास्यपदक मिळवून शेवट गोड झाला.
अनेक खेळांडूनी यावेळी नीरज आणि सर्व खेळाडूंचे कौतूक केले.पी.टी.उषाने यावेळी ट्विटरवर सांगितले की माझं अपूर्ण स्वप्न आज पूर्ण झालं. नुकतचं निधन झालेल्या मिल्खा सिंग यांना नीरज चोप्राने आपलं सुवर्णपदक अर्पण केलं. मेरी कोम हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचं राष्ट्रगीत टोकियोत झालं आणि तमाम भारतीयांच्या माना त्या तिरंग्यापुढे नमन झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरज चोप्रा आणि सर्व खेळाडूंचे कौतुक केले. ऑलिंम्पिकचा अखेरचा दिन सोनेरी झाला. अजी सोनियाचा दिन, असं म्हणत आज ऑल्म्पिकचा दिवस गोल्ड झाला हेच खरं.
म्हणून म्हणावसं वाटत
Now its happened
All eyes turn your way
Wide with expectancy
But you are sweating
holding up the trophy
still in its box
pointing at it saying here it
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस, निखिल जाधव