श्रीनगर, ३ डिसेंबर २०२२ : काश्मीरमधील सुरक्षा दलांची गळचेपी होत असल्याने सामान्य काश्मिरींचा पाठिंबा कमी होत चाललेला आहे. यादरम्यान, काश्मिरी दहशतवाद्यांची प्रमुख संघटना हिजबुल मुजाहिदीनने आपले शेवटचे श्वास मोजण्यास सुररवात केली आहे. काश्मिरी तरुणांना शस्त्र, निवारा, पैसा, आणि पाठिंबा हे काही नाही. एकेकाळी या संघटनेत सुमारे पाच हजार दहशतवादी होते; पण आज केवळ पाचच दहशतवादी उरले आहेत. याशिवाय हिजबुलचे ओव्हरग्राउंड वर्कर आणि आर्थिक नेटवर्क दोन्ही जवळजवळ नष्ट झाले आहे. त्याचवेळी पाकिस्तानने अनेक नव्या दहशतवादी संघटना उभ्या करून हिजबुलला मार्जिनवर ढकलले आहे.
काश्मीरचा मोहम्मद युसूफ शाह ऊर्फ सय्यद सलाहुद्दीन हा या संघटनेचा मुख्य कमांडर असून तो ३१ वर्षांपासून गुलाम जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनची स्थापना सप्टेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने केली होती. उत्तर काश्मीरमधील पट्टण बारामुल्ला येथील जमात-ए-इस्लामीचे प्रमुख कार्यकर्ते मास्टर अहसान दार यांना पहिले कमांडर बनवण्यात आले. सलाहुद्दीन १९९१ मध्ये ऑपरेशन चीफ कमांडर बनले. त्याचे बहुतेक केडर जमात-ए-इस्लामीच्या सहानुभूती असलेल्या विभागांमधून काढले गेले आहेत.
तीन वर्षांत तीन डझनहून अधिक स्थानिक तरुण हिजबुलचे दहशतवादी बनले. त्यापैकी बहुतांश लोक मारले गेले आहेत. सुमारे चार महिन्यांपूर्वीपर्यंत हिजबुलच्या दहशतवाद्यांची संख्या आठ ते नऊ होती. सध्या पाच दहशतवादी शिल्लक आहेत. फारुख नल्ली हे त्यापैकी सर्वांत जुने आहेत. इतर नवीन आहेत. इतर चार दहशतवाद्यांमध्ये आसिफ सहा महिन्यांचा आहे. पाच दहशतवादी कधी पुलवामा, तर कधी शोपियानमध्ये आपले लपण्याचे ठिकाण सतत बदलत असतात.
राजकीय कार्यकर्ते सलीम रेशी यांनी सांगितले, की सुरक्षा दलांनी ज्या प्रकारे हिजबुल मुजाहिदीनच्या सर्व प्रमुख कमांडरना संपवले आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या ओव्हरग्राउंड नेटवर्कवर कारवाई केली आहे. त्यामुळे नवीन भरती कमी झाली आहे किंवा थांबली आहे, असे म्हणायला हवे. गेल्या चार-पाच वर्षांत जो कोणी दहशतवादी झाला, तो इंटरनेट मीडियावर जिहादी घटकांच्या संपर्कात होता. त्याच्यावर हिजबुल किंवा जमात-ए-इस्लामपेक्षा लष्कर आणि जैशसारख्या संघटनांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड