पुणे, दि. ७ जून २०२० : आहार विहारातील चुकीच्या बदलामुळे विकार तयार होत असून, गोळ्या – औषधांनी तात्पुरती सुटका होत असली तरी संपूर्ण विकारमुक्त औषधांशिवाय जीवन जगण्यासाठी “निसर्गोपचाराची’ कास धरावी “, असे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या “नेचर क्युअर’ संस्थेच्या संचलिका डॉ. सोनाली घोंगडे ‘न्यूज अनकट‘ वर आपल्या भेटीला येणार आहेत.
‘नेैचरोथेरपी स्पेशल‘ या शिर्षकाखाली ‘धन्वंतरी‘ च्या या आठवड्यात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे.
निसर्गातील घटक आणि पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला निसर्गच आवाक्यात ठेवतो. मात्र, वात, कफ, पित्त या त्रिदोषांचा समतोल बिघडला की, विकार उत्पन्न होतो. आहार-विहारातील चुकीचे मेळ व बदल आपल्याला घातक ठरतात. निसर्गोपचार ही अधिक दूरगामी व उपयुक्त उपचारपद्धती असून, तिचा अंगीकार आपण केला पाहिजे.
चुकीच्या जीवनशैलीने छोटे आजार उत्पन्न होतात, त्याकडे दुर्लक्ष केले, तर मोठे आजार होतात . मुळात आजार होऊच नये, अशी दिनचर्या, व्यायाम आहाराचे वेळापत्रक, आखणे शक्य आहे. निसर्गोपचार केंद्रात काही-दिवस जाऊन शरीरशुद्ध करून परत घरी ते बिघडविण्यापेक्षा आपले घर किचन, हेच निसर्गोपचार केंद्र कसे होेईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
योग्य आहार हेच औषध म्हणून गुणकारी ठरते. चांगल्या व्यायामाला आहाराची जोड द्यावी. आठवड्यातून एकदा लंघन करून फळे, भाज्यांचे रस, आवळा रस पिऊन शरीर शुद्धी करावी. सकाळी कडधान्ये, फळे, भाज्या, सुक्या मेव्याची न्याहारी करावी. तुळस, लवंग, दालचिनी उकळून केलेला पावडर विरहित चहा प्यावा. लिंबू पाणी, मध पाणीद्वारे दररोज शरीराची अंतर्गत सफाई करावी. हातसडीचा तांदूळ ,न चाळलेले गव्हाचे पीठ,भाकरी आहारात असावे आणि मांसाहार टाळावा, अशा काही टिप्ससह वजन, केस आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची यासारखे खास उपाय ते आपल्याला सांगणार आहेत.
लॉकडाऊनच्या या काळात खास करून महिला वर्गाला धन्वंतरीचे हे भाग नक्की आवडतील. या आठवड्यात सोमवार, बुधवार तसेच शुक्रवारच्या धन्वंतरीच्या तिन्ही भागात डॉ. सोनाली घोंगडे खास ‘“निसर्गोपचार” पद्धतींवर आपल्याला मार्गदर्शन करतील. पाहायला विसरू नका, या आठवठ्यात ‘न्यूज अनकट’ निर्मित “धन्वंतरी.” या कार्यक्रमात. नक्की पहा सकाळी १०.३० वाजता ‘ धन्वंतरी ‘ फक्त न्यूज अनकट वर.
न्यूज अनकट प्रतिनिधी