गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : हॉलिवूडचा अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांना कोरोनाचा लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. हे दोघेही काही कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेले होते. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी ही लक्षणं दिसू लागली. त्यांनी कोरोनाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते आहे.

आतापर्यंत १०० हून अधिक देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानंतर जगभरत भीतीचे वातावरण आहे. आता कोरोना हॉलिवूडमध्येही पोहोचला आहे. हँक्स आणि रिटा दोघेही ६३ वर्षांचे आहेत. क्वीन्सलँडमध्ये सर्दीची लक्षणं दिसून आल्यावर वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केल्याचे त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.
आता ते काही काळ सर्वांपासून दूर राहून उपचार घेतील.
एल्विस प्रिसलेच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं चित्रिकरण करण्यासाठी ते गोल्ड कोस्ट येथे गेले होते. हँक्स यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, आम्हाला थोडसं थकल्यासारखं वाटत होतं. सर्दी आणि अंगदुखीचा त्रास होत होता. रिटालाही सर्दी होती आणि थोडा तापही आला. तपासणी केल्यानंतर आम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!
Exit mobile version