गोल पोस्ट स्पॉटलाइट “रहस्य” कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

“रहस्य” कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

वाघोली: पुण्यात नुकताच गणेश महादेव लिखित “रहस्य ” या कांदबरीचा प्रकाशन सोहळा जेष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांच्या हस्ते संपन्न झाला.
वाचकांना कथा- कादंबऱ्यांच्या माध्यमातून नवी मिथकं, नव्या पिढीसाठी गरजेची आहे. हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स ही पाश्चत्यांची मिथकंच आहेत. अशा पद्धतीचं कथानक “रहस्य ” या कादंबरीतून मांडले गेले आहे.

विश्वकर्मा पब्लिकेशनच्या गणेश महादेव यांच्या रहस्य कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी जेष्ठ लेखक वसंत वसंत लिमये,जेष्ठ कादंबरीकार संजय सोनवणी, व घनश्याम पाटील उपस्थित होते. त्यासोबतच विश्वकर्मा प्रकाशनाचे सीईओ विशाल सोनी व संपादक मनोहर सोनवणी, सह संपादक संदीप तापकीर उपस्थित होते.

गुप्त धनासारखा विषय कादंबरीत मांडला जरी असला तरी देखील कोणत्याही प्रकारच्या अंधःश्रद्धांपासून शुद्ध आध्यात्मिक विचार या कादंबरीतून माडल्याचे लेखक गणेश महादेव यांनी सांगितले

error: Content is protected !!
Exit mobile version