गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा रवी अधिकारी यांचे दिग्दर्शनात पदार्पण

रवी अधिकारी यांचे दिग्दर्शनात पदार्पण

मुंबई: श्री अधिकारी ब्रदर्सची पुढची पिढी अर्थात रवी अधिकारी आणि कैलास अधिकारी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. सध्या  ‘धीत पतंगे’ या वेब चित्रपटाद्वारे रवी अधिकारी दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी रवी बोलताना म्हणाला की, पदार्पण करताना खूप छान वाटतं आहे. आधीपासून घरात काका, वडील यांना मी सिनेइंडस्ट्रीत काम करत असल्याचं पाहत आलो आहे.
लहानपणापासून मी पण आपण देखील याच क्षेत्रात काम करायचं ठरविले होते आणि आता ते सत्यात उतरत आहे तर माझ्यासाठी हा खास क्षण आहे.
माझे वडील पण दिग्दर्शक होते. लहानपणी वडिलांसोबत सेटवर जायचो. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. मी चांगल्या कथेसोबत पदार्पण करायचे ठरविले होते. मी कोणत्या माध्यमातून पदार्पण करायचे हे ठरविले नव्हते. त्यामुळे वेबसिरीज मधून पदार्पण करत असल्याचा मला आनंद आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version