गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

पुणे, ५ ऑगस्ट २०२३ : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. रविवारी ते चिंचवड येथे होणाऱ्या बहुराज्यीय सहकार संस्थासाठीच्या पोर्टलचे उद्धाटन करणार आहेत. यानिमित्त सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह काही महत्वपूर्ण राजकीय गाठीभेटी व विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शहा हे पुण्यात शनिवारी रात्री पुण्यात मुक्कामी येत आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांचे स्वागत करतील. रविवारी चिंचवड येथील राधाकृष्ण मोरे बहुउद्देशीय हॉलमध्ये, दुपारी १२ वाजता केंद्राने मल्टीस्टेट सहकारी संस्थांसाठी विकसित केलेल्या एकात्मिक पोर्टलचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील बहुराज्यीय सहकारी संस्थांचे पदाधिकारी, साखर महासंघ व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधीसह सुमारे दिड हजार सदस्य यावेळी उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर रविवारीच सायंकाळी ते पुन्हा दिल्लीला रवाना होतील.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा