पुरंदर मधील नीरा वाल्हे मध्ये होम टू होम सर्वे सुरु

पुरंदर, दि.१३ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यात आज वाल्हे आणि नीरा या शहरातून कोरोना रुग्ण शोधण्यासाठी होम टू होम सर्वे करण्यात येत आहे. सकाळी साडे दहा वाजल्या पासून हा सर्वे सुरु करण्यात आला आहे. या सर्वेला लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात कोरोनामुळे मृतांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी होम टू होम सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज वाल्हा आणि नीरा या गावांमधून सर्वे करण्यात येत आहे. नीरा येथे ४० टीमच्या माध्यमातून सर्वे करण्यात येत आहे. यामध्ये लोकांना १६ प्रश्न विचारण्यात येत आहेत. या पैकी तीन प्रश्नांचे उत्तर होकारार्थी आल्यास किंवा ज्यांची ऑक्सिजन लेवल ९५ पेक्षा कमी आहे किंवा तापमान १०० पेक्षा कमी आहे अशा लोकांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

आज सकाळी साडे दहा वाजता या सर्वेला सुरवात करण्यात आली. यावेळी पुरंदर दौंडचे प्रांत अधिकारी अनिल गायकवाड,तहसिलदार रुपाली सरनोबत, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली घाटगे सह स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ४० टीम मार्फत प्रत्येक वार्डातून विभागून सर्वे सुरु आहे आज दुपार पर्यंत ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सायंकाळी या बाबतच्या निकाल पुरंदरच्या तहसीलदार जाहीर करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा