होमगार्डला बेदम मारहाण; १३ जण पोलिसांच्या ताब्यात

सातारा: (२४ एप्रिल २०२०)
सातारा शहरातील सदर बझार परिसरातील कॅनॉललगत असणार्या् झोपडपट्टी लगत बंदोबस्तास असणार्याह होमगार्डने, मास्क न वापरण्याबाबत एका युवकाला हटकल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर त्या युवकाने झोपडपट्टीतील लोक जमवून होमगार्डला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह सुमारे १३ जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेअकराच्या सुमारास सातारा शहरातील सदर बझार परिसरात बंदोबस्तावर असणार्याा एका होमगार्डने झोपडपट्टीकडे चालत निघालेल्या एका युवकाला हटकले आणि मास्क न लावण्याचे कारण विचारले. त्यानंतर त्या युवकात आणि होमगार्डमध्ये शाब्दिक चकमक झाली. तो युवक यानंतर त्याच्या घरी गेला. थोड्याच वेळात त्या युवकाने सुमारे ५० जणांचा जमाव करून सदर बझारच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तास असणार्या संबंधित होमगार्डवर हल्ला केला.
होमगार्डला मारहाण झाल्याची माहिती कोणीतरी सातार्याकतील कंट्रोल रुमला दिल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचार्यां नी घटनास्थळी धाव घेतली. आता होमगार्डला मारहाण करणार्यार तीन महिलांसह तेरा जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित लोकांचाही पोलिस शोध घेत आहेत. जखमी होमगार्डवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनास्थळी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली असून बंदोबस्तास असणार्यात पोलिस कर्मचारी अथवा होमगार्डच्या अंगाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा