हनी सिंगच्या पत्नीने मागितली १० कोटींची भरपाई, गायकावर केले गंभीर आरोप

नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०२१ : बॉलिवूड गायक आणि अभिनेता हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केलाय. यासह तिने १० कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केलीय. घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्याअंतर्गत हा आरोप करण्यात आला आहे. शालिनी सांगते की, तिला प्राण्यांप्रमाणं वागणूक देण्यात आली आणि तिच्यावर अत्याचारही करण्यात आले.

मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी हनी सिंगच्या विरोधात नोटीस बजावताना म्हटलंय की, या दोघांच्या नावावर जी काही मालमत्ता आहे त्यात तृतीय पक्षाचा हात असू नये. तसेच, त्याला पत्नीचे दागिने आणि इतर वस्तू विकण्याचा अधिकार नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, शालिनी तलवार म्हणते की, गैरवर्तन करण्याव्यतिरिक्त तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक अत्याचार आणि बोलण्यासारख्या अनेक गोष्टी केल्या गेल्या. हनी सिंगसोबत तिला कुटुंबीयांनीही दुखावलं आहे. गेल्या काही वर्षांत हनी सिंगने तिच्यावर हात देखील उगारला आहे. ती भीतीने जगत होती. गायक आणि त्याचे कुटुंब तिला शारीरिक त्रास देत आहेत. शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत असं लिहिलंय की, मानसिक छळामुळं ती नैराश्यात आलीय आणि तिची औषधेही चालू आहेत. हनी सिंगने २३ जानेवारी २०११ रोजी शालिनीशी लग्न केलं.

गेल्या १० वर्षांपासून ती शारीरिक तणावातून जात आहे. गायक आणि त्याच्या कुटुंबानं तिला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे तोडले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शालिनी सिंगने हनी सिंगवर इतर महिलांसोबत प्रासंगिक सेक्स केल्याचा आरोपही केलाय. त्याने आपली एंगेजमेंट रिंग देखील घातली नव्हती. यासह, तो शालिनीसोबत गैरवर्तन करायचा.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा