हनिमूनच्या ठिकाणाहून मोडला संसार…

उत्तर प्रदेश : आजकाल घटस्फोट घेण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हनीमूनवरून चांगलेच वाजले आहे. दोघांमध्ये वाद इतका टोकाला गेला आहे की, आता दोघे घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. भांडणाचे कारण एवढेच की पतीने हनीमूनला स्विर्त्झलँडला नेण्याऐवजी दार्जिलिगला नेले.

स्विर्त्झलँडला जाऊन चांदणी चित्रपटातील गाण्यासारखे फोटो काढायची नववधुची इच्छा होती. परंतु पतीने दार्जिलिंगला हनीमूनला नेल्याने नववधूचे हे स्वप्न तुटले आणि दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.

उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये १० नोव्हेंबर २०१६ रोजी एका दाम्पत्याचे लग्न झाले होते. पत्नीने स्विर्त्झलँडला हनीमूनला जाण्याचा हट्ट धरला. परंतु पतीने लग्नाच्या पूर्वीच दार्जिलिंगचे तिकीट बूक केले होते. त्यामुळे पत्नी नाराज झाली होती. पतीने कसेबसे पत्नीला समजावले आणि तिला दार्जिलिंगला घेऊन गेला. परंतु दार्जिलिंगमध्ये गेल्यावर पत्नीने चांगला तमाशा केला. आपल्या पतीशी तिने चांगलेच भांडण केले. त्यामुळे पतीही नाराज झाला.

स्विर्त्झलँडमध्ये जाऊन चांदणी चित्रपटातील श्रीदेवी सारख्या साड्या नेसून फोटो शूट करण्याची पत्नीची इच्छा होती. लहानपणापासून हे आपले स्वप्न असल्याचे पत्नीने सांगितले परंतु पतीने स्विर्त्झलँडऐवजी दार्जिलिंगमध्ये हनीमूनला नेल्यावर पत्नीचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. त्यामुळे नाराज होऊन पत्नीने लग्नाच्या चारच महिन्यानंतर माहेरचा रस्ता धरला. आता दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा