गोल पोस्ट राष्ट्रीय हनिमूनच्या रात्री पत्नी झाली गायब

हनिमूनच्या रात्री पत्नी झाली गायब

वाराणसी : लग्नानंतर रात्री हनिमूनच्या तयारीत पती पत्नीची वाट पहात बसला होता. परंतु बराच वेळ झाला तरी पत्नी खोलीमध्ये आलीच नाही. त्याने आजूबाजूला चौकशी केली पण कुनालाही काही माहीत नाही, असेच उत्तर मिळाले. त्यानंतर पत्नी गायब झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणशीमधील लल्लापूरा भागातील एका युवतीचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. विवाहानंतर माहेरी गेलेली युवती सासरी आली. सासरी आल्यानंतर कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण होते. कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवण केले. नवरदेवाची खोली हनिमुनसाठी सजवण्यात आली होती. सर्व आवरल्यानंतर घरातील सर्व सदस्य झोपण्यासाठी गेले. तसेच नवराही सजवण्यात आलेल्या खोलीमध्ये गेल्यानंतर पत्नीची वाट पाहू लागला.
परंतु बराच वेळ झाला तरी पत्नी खोलीत आली नाही. त्यानंतर नवरा आला आणि इतर सदस्यांकडे चौकशी करू लागला. मात्र, नवरी कुठेच दिसली नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्य रात्रभर वाट पाहात बसले. रात्रभर वाट पाहिल्यानंतर सकाळी अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस नवरीचा शोध घेतला तर एक गोष्ट समोर आली की, मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.तिला शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version