होंगकोंग बाबत निर्णयाचा अधिकार आम्हालाच

बीजिंग: हॉंगकॉंग वर चीन आपला हक्क दाखवत आहे तर एका बाजूला हॉंगकॉंग मधील नागरिक चीनच्या या अधिकाराला विरोध करत आहेत. चीन मध्ये लोकशाही ही अस्तित्वात नाही. चीनमधील जवळजवळ सर्व गोष्टींवर सरकारचे नियंत्रण आहे. तर एका बाजूला हॉंगकॉंग मध्ये लोकशाही पद्धतीने सर्व कामे चालतात व नागरिकांना स्वतंत्र अधिकार सुद्धा आहे.
परंतु काही महिन्यापासून चीनने होंगकोंग मध्ये जबरदस्तीने काही नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात होंग कोंगमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने करण्यात येत आहे व ही प्रदर्शने चीनच्या सैन्याकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकारांमध्ये होंकॉंग चा शेअर बाजारही कोसळला आहे. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर हॉंगकॉंग मधील घटनात्मक मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ चीनलाच आहे असे चीन सरकारने आज स्पष्टपणे बजावले. हॉंगकॉंग मधील आंदोलकांना काळा मास्क घालण्यास मनाई करणाऱ्या निर्णय स्थानिक न्यायालयाने रद्द केल्यावर चीनने नाराजी व्यक्त करत इशाराच दिला आहे. तसेच चीनच्या या इशाऱ्यामुळे हे आंदोलन चीन सरकार त्यांच्या पद्धतीने हाताळणार असल्याची भीती आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा