“मी मराठी प्रतिष्ठान” कडून दहावी बारावी पास विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

हडपसर, दि. १६ ऑगस्ट २०२०: सध्या कोरोना वायरस जगभरात थैमान घालत असताना यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी व देशाचा तिरंग्याचा मान म्हणून सेवेत सदैव तप्तर असलेल्या कोरोना योद्धांना व स्वातंत्र्यदिनी तीन रंगाचे प्रतिक असलेल्या राष्ट्र ध्वजाला सलामी दिली गेली, ‘मी मराठी प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष वैभव भाऊ गाढवे, दीपक सावळकर महाराष्ट्र राज्य, कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज हडपसर येथे गोसावी वस्ती वैदूवाडी, काळेपडळ, संकेत विहार, फुरसुंगी, येथील सर्व दहावी बारावी पास यशस्वी विद्यार्थ्यांना मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल धडके, शहर अध्यक्ष सुधीर नायर, महिला जिल्हा अध्यक्ष अमृत पठारे, शहर अध्यक्ष नंदाताई जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र गुलाब श्रीफळ देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. हडपसर वैदवाडी, फुरसुंगी काळेपडळमधील सर्व समाजातील  ७५% व त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मी मराठी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिनंदन पत्र प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी सरकारी नियमांचे पुरेपूर पालन करून सुरक्षित अतंर व तोंडाला मास्क लावून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी छत्रपती युवा सेना हवेली प्रमुख आदेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते सागर चकोर, योगेश हिवाळे अनिल तेलुरे, रामदास कोल्हे आधी सर्व कार्यकते पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा