‘Honor’ कंपनीचा पहिला लॅपटॉप लाँच

मुंबई, ३ ऑगस्ट २०२० : ‘Honor’ कंपनीचा पहिला लॅपटॉप ‘MagicBook 15’ हा AMD Ryzen 3000 सीरिज सीपीयूसोबत भारतात लाँच झाला आहे.

वैशिष्ट्ये :

Honor MagicBook 15 मध्ये विंडोज १० प्री-इंस्टॉल्ड मिळणार असून १५.६ इंचचा फुल एचडी+आईपीस डिस्प्ले दिला आहे.

लॅपटॉपची स्क्रिन रेजोल्यूशन १९२० × १०८० पिक्सल असून १७८ डिग्री व्यूइंग अँगल आणि ८७ टक्के स्क्रिन टू बॉडी रेशो आहे.

हा डिव्हाइस AMD Ryzen 5 3500U प्रोसेसरवर काम करत आहे, तसेच Radeon Vega 8 ग्राफिक्सचा उपयोग केला गेला आहे.

डिव्हाइसमध्ये 8GB DDR4 dual-channel रॅम दिला असून यामध्ये 256 GB PCIe NVMe SSD आहे.

यामध्ये 65W चार्जर दिला आहे आणि टाईप सी पोर्टच्या मदतीने लॅपटॉप चार्ज केला जाऊ शकतो.

कनेक्टिविटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, एनएपसी, यूएसबी २.०, यूएसबी ३.०, एचडीएमआई पोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट यांसह अनेक फीचर्स दिलेले आहेत.

या लॅपटॉपची भारतीय बाजारातील किंमत ४२ हजार ९९० रुपये इतकी असून युजर्स हा लॅपटॉप Flipkart च्या माध्यमातून खरेदी करू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा