टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

28
माढा, १ फेब्रुवरी २०२१: माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मार्च २०२० मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्थानिक स्कुल कमिटी सदस्य परमेश्वर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास माजी उपसभापती तुकाराम ढवळे, वैभव कुटे, राजेंद्र कोठारी, रमेश येवले-पाटील, रावसाहेब ताठे, वसंत येवले-पाटील, महेश बोबडे, राजेश बागवाले, सिद्धेश्वर महाडिक, यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.टी.गोंजारी यांनी केले.
यावेळी टेंभुर्णी इयत्ता दहावीच्या परीक्षेत टेंभुर्णी केंद्रात प्रथम आलेला अनिकेत देशमुख, रोहित बागवाले, वैष्णवी इंगळे, विद्या गाजरे यांच्यासह ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले व सर्व विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्रशालेतील अमोल डायरे, महादेव पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पोनि राजकुमार केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व शिस्तीचे महत्व पटवून दिले. तर तुकाराम ढवळे यांनी विद्यार्थ्यांनी परिक्षेतील गुणा एवढेच आपल्यातील कलगुण विकसित करण्यासाठी वाव द्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक एम.एस.भुजबळ, के.एस.गायकवाड, एस.जी. बोराडे,सुनील मिरगणे, एस.के.शिंदे, आर.टी.लष्कर,पी.बी.मोरे, आर.बी.खंडागळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.ए.बरबडे यांनी केले तर आभार एम.आय.पवार यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा