जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटलांचा चांगल्या कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान

पुरंदर दि. २९ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटलांनी सन २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रसंगी तसेच सध्या सुरू असलेल्या कोवीड-१९ आजारात केलेल्या कामगिरीबद्दल पुरंदर भोरचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पोलीस पाटलांच्या कामाची दखल घेत त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

आज जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये पुढे येणाऱ्या विविध सण व समारंभाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या कायदेशीर उपाय योजना संदर्भात जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुढील काळात म्हणजेच राम मंदिर बांधकाम शुभारंभ, बकरी ईद व गोकुळाष्टमी या विविध सणांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर तालुक्यातील पोलीस पाटलांनी २०१९ च्या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले सन्मानपत्र पोलीस पाटलांना प्रधान केले. तसेच सध्या सुरू असलेल्या कोवीड-१९ या आजारात विविध गावच्या पोलीस पाटलांनी केलेल्या कामाची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या वतीने पोलीस पाटलांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माने म्हणाले की, जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांचे काम उल्लेखनीय आहे त्यांच्या सहकार्यामुळेच या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्हाला मोठे यश आले. त्याचबरोबर त्यांचे कोवीड-१९ च्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा मोठे सहकार्य लाभले.

”तालुका पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस पाटलांवर विश्वास दाखवला व  कामाची जबाबदारी दिली. त्याचबरोबर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळेच आम्ही हे काम करू शकलो. त्यामुळे ज्यांनी ही संधी दिली त्या पोलीस प्रशासनाचे आभारी आहोत. त्याचबरोबर यापुढे प्रशासनाने दिलेल्या सर्व त्या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी सर्व पोलीस पाटील सदैव तत्पर असतील.” मोहन‌ इंगळे (कार्याध्यक्ष पोलीस पाटील संघटना तालुका पुरंदर)

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा