कंटनेर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

धुळे, ४ जुलै २०२३: मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावानजीक वेगाने जाणाऱ्या कंटनेरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना आज घडली आहे. या भीषण अपघातात आठ जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटना स्थळांवर पोलिस प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पळासनेर गावाकडे येणाऱ्या कंटनेरवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा कंटेनर महामार्गावरुन जाणाऱ्या दुचाकी कार तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर आदळला. यानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. हा अपघात ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज असून अपघातात चालक देखील ठार झालाय तर १५ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शिरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन हिरे आणि अन्य पोलिस दल यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा झाल्यामुळे मदत करायला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा